काय हवे ते कळेना
कोण देई ते कळेना
कसे मागू ते कळेना
दिले का नाही कळेना .... जीव शांत होईना I १ I
अपुरेपणाची जाणीव
अर्धवट ज्ञानाची नेणीव
मी मीपणाची राणीव
समाधान काही होईना ..... जीव शांत होईना इ I २ I
दुखः कसे ते सोसेना
सुखाची हौस भागेना
पाठलाग तो थांबेना
वाढावी संपत्ती दैना ..... जीव शांत होईना I ३ I
किती करू समजावणी
कोणाची करू आळवणी
अनेक शंका अडचणी
थारा कसा तो लागेना ....... जीव शांत होईना I ४ I
अवचित देव भेटला
बाल निरागस हासला
देव तेथे निहारला
आनंद फिरुनी गवसला ....... जीव शांत जाहला I ५ I
देवाची भेट झालीना झालीना झालीना
देवाची भेट झालीना झालीना झालीना