कवितेच्या पानावर
दवबिंदुची थर थर
जाशी जाणीव अधर
आता होती नेली कोणी
कवितेच्या पानावर
स्फटिक तो आरस्पानी
हिरव्या मध्ये हरवुनी
रूप हिरवे लेवुनी
कवितेच्या पानावर
साद घालतसे वारा
जीव होतसे अधीरा
आपणास संपवुनी
कवितेच्या पानावर
शब्दरुपी लगबग
काय काय सांगतसे
काही गेलेच राहुनी
कवितेच्या पानावर
सूर्य माथ्यावर आला
रंग हिरवा चालला
थेम्बा थेम्बा घालवुनी
कवितेच्या पानावर
पानोपानी कुजबुज
नवे रूप नवा साज
कोण येइल घालुनी
कवितेच्या पानावर
रंग मातीचा चढला
देठ वालन्या लागला
ओढ मातीची लावुनी
कवितेच्या पानावर
दिसे मिटण्याची घाई
तयारीत दंग होई
रहावया माती पाणी
Arvind Khare
17-3-2013