हाकारिता आयुष्य गेले साद कशी येईना
काय चुकले कमी पडले काहिचकी कळेना
अवचित कळले हाकारीत होतो मीच माझे मला
कशास केला मज वेगळा कृष्णा असा मी तुला
मीच राधा मी सुदामा मेळा मीच गोपाळांचा
उतरंडीचा खेळ कृष्णा एकरूप दोघांचा
पडणे, चढणे, हंडी फोडणे अवघ्या तुझ्या लीला
ठेव आम्हा त्या पायरीवरी जिथे पहावे तुला
परतोनी यावे फिरुनी पहावे पुन्हा रमावे तुवा
खेळ काळांतरी चा आम्हा असाच चालू हवा
तुच आरंभी तुच शेवटी तुच तू आधी मधीही
तुझ्या वीना कोणी नाही कुठे आणि केंवाही
काय चुकले कमी पडले काहिचकी कळेना
अवचित कळले हाकारीत होतो मीच माझे मला
कशास केला मज वेगळा कृष्णा असा मी तुला
मीच राधा मी सुदामा मेळा मीच गोपाळांचा
उतरंडीचा खेळ कृष्णा एकरूप दोघांचा
पडणे, चढणे, हंडी फोडणे अवघ्या तुझ्या लीला
ठेव आम्हा त्या पायरीवरी जिथे पहावे तुला
परतोनी यावे फिरुनी पहावे पुन्हा रमावे तुवा
खेळ काळांतरी चा आम्हा असाच चालू हवा
तुच आरंभी तुच शेवटी तुच तू आधी मधीही
तुझ्या वीना कोणी नाही कुठे आणि केंवाही