हरीचिया द्वारी व्हावे हरीची पायरी
तेथे म्या पामरे मग करावी चाकरी ll १ ll
लागेल गा तेथे संत चरण धूळ
तिला पाहुनी मज आठवेल माझे मूळ ll २ ll
पाय धरोनिया हाती धूळ लावीन ललाटी
जणू माय आली भेटी दूर लेकराच्या साठी ll ३ ll
मूळ मायेस स्मरावे तेणे हरिदास व्हावे
प्रौढपणाचे ओझे उगा माथा का वहावे ? ll ४ ll
धुळीमाजी धुळीकण करी मोजदाद कोण ?
एका मातीचेच सारे तुम्ही आम्ही देवगण ll ५ ll
जाऊ देवाचिया द्वारी सुखे ओलांडू पायरी
राहू होऊ देवापरी अहंकार हद्दपारी ll ६ ll