Saturday, December 8, 2018

STHIR-MATI

स्थिरमति 

" तेषां के योगवित्तमाः " ?  गीतेच्या बाराव्या अध्यायाच्या पहिल्या श्लोकातील शेवटच्या चरणातील ह्या अर्जुनाच्या प्रश्नाचे उत्तर म्हणून सर्व अध्याय सांगितला  आहे .  त्या योगवित्तमातील भगवंताला प्रिय कोण हे श्लोक क्रमांक १३ ते २० मध्ये सविस्तरपणे अनेक गुणांचे वर्णन करत सांगितले आहे. त्यातील श्लोक क्रमांक १९ मध्ये हा स्थिरमति शेवेचा गुण भगवंतांच्या तोंडी घातला आहे. " अद्वेष्टा सर्वभूतानांम  " पासून अनेक गुण सांगत सांगत स्थिरमति  ह्या  शब्दाने ते विवेचन संपते. सर्वच गुणांविषयी खुप काही सांगण्याजोगे आहे पण सध्या ह्या शेवटच्या गुणाविषयी भाष्य करायचा मानस आहे. 
स्थिर ज्याची मति  तो स्थिरमति अशी ह्या समासयुक्त शब्दाची फोड आहे. पहिला शब्द स्थिर असला तरी मति शब्दावर आधी विचार करू या. बरेच लोक मति आणि बुद्धि शब्द समानार्थी समजतात  तसे नाहीये. स्थिरबुद्धि असा शब्द  सुद्धा वापरता आला असता. तो वापरला नाही ह्याचा अर्थ दोघांमध्ये काही भेद आहे . मतीमध्य मत आहे. मत हे बुद्धीच्या एक पायरी वर आहे. सारासार विचार करून निश्चय केलेली बुद्धि  म्हणजे मति असे हि नाही . तर निश्चय केलेल्या बुद्धीप्रमाणे अनुसरुन कृतीसाठी एकत्रित रित्या तयार होणारी गोष्ट म्हणजे मति . ती कृतिशील असते. नुसती बुध्दि निश्चयापलीकडे काही करत नाही. मन शरीराकडून निश्चय केलेली गोष्ट घडवून आणते . ती मति . " मति गेली गती गेली , गतिविना राष्ट्र गेले " असा मतीचा उल्लेख महात्मा ज्योतिबा फुले ह्यांनी केला आहे. पण ह्या सार्वजनिक मतीचा इथे विचार नसून वैयक्तिक मतीचा विचार आहे. वैयक्तिक पातळीवर सुद्धा हे मन आणि बुद्धीचे ऐक्य अपेक्षित आहे. " अर्जुना  हे सार जाण  बा  योगाचे, मना आणि बुद्धीचे ऐक्य जेथे "  असे ज्ञानेश्वरांनी   मध्ये लिहिले आहे. त्याला गीतेमध्ये समत्व योग असा शब्द गीतेमध्य दुसऱ्या अध्यायात वापरला आहे. 
ह्या सर्व विवेचनामध्ये एक गोष्ट लक्षात ठेवायला हवी कि मन  आणि बुद्धि एकत्रित पणे सुद्धा भटकू शकतात. निश्चय जसा भला  किंवा बुरा असेल त्या प्रमाणे  कृति  होईल. उपजत स्वभावानुसार एकत्र होऊन सुद्धा   बहिर्मुख असण्याची शक्यता ज्यास्त आहे. म्हणूनच मतीची उपजत बहिर्मुख असणारी अंतर्मुख करून  आत्मतत्वाशी स्थिर करून त्यात धरून ठेवणारी मति हि  स्थिरमति .अशी  शब्दाची  योजना केली आहे.

हि ज्या योग्याने धारण काली आहे तो मला अतिशय प्रिय आहे. असे सांगून तो तास हो अशी सूचना शेवयाची २० क्रमांकाच्या  श्लोकात करून ह्या अध्यायाची सांगता झाली आहे. 

श्रीकृष्ण परमात्मने नमः 

  .