Saturday, July 6, 2019

LIFE SKETCH



काय करू रे बाबांनो मी माझाच असा रहात नाही ।
वाढ वाढत्या चौकटीतही माझे चित्र मावत नाही ।।
करू पाहतो जे जे काही ते माझे असे म्हणवत नाही ।।
इतरांच्या रंग रेषा त्या चित्रामधे मिसळत जाती ।।
मीच काढतो पुसून टाकतो नजर लावून क्षितिजापुढती ।।
अंधुक आकृत्या काही येती हाती तोची निसटून जाती ।।
अगाध चित्र ,अफाट चितारी येई  माया गुणी आकारी ।।
माझे म्हणून किती हाकारी अंती निश्चित यमाची स्वाक्षरी ।।
तनाचे वार्धक्य मनाचे आधिक्य आवरावे ही गोष्ट खरी ।।