साधन हे सोपे करून बघावे l
बोले देवासवे आपुल्या स्वभावे ll १ll
मनातील भ्रांत होईल निवांत l
सारे खेद खंत देवा असे ठावे ll २ ll
नको न्यायान्याय पाप आणि पुण्य l
नको भिक राज्य सुखाने वर्तावे ll ३ ll
नको गांजणूक नको आराणूक
नको गुंतणूक मोकळे असावे ll ४ ll
सोबती सांगाती उच्चनीच जाती
नको त्यांची ख्याति एकचि उरावे ll ५ ll
आपण गोमटे जनहि गोमटे
सकल गोमटे करूनी सरावे ll ६ ll
मुख्य ते स्वहित थोडे जनहित
काही करू गत परत न यावे ll ७ ll
थोडेसे कवित्व वाढवी महत्व
कामा येई सत्व आता निरवावे ll ८ ll
No comments:
Post a Comment