Friday, August 5, 2016

M. H. HIGH SCHOOL FOR 125 YEAR CELEBRATION.

मोहवी लोभवी लाघवी हवी हवी लाघवी हवी हवी ।।धृ ।।

विद्यालय मोहवी आठवणी किती जागवी  ।
आंबटगोड चघळीता मध्यकाळ लोपवी  ।। १ ।।

वाटे हे तर कालचे इथेच घेतले घ्यायचे  ।
हसविता रडवायचे रडविता हसवायचे   ।।२।।

शहाणपण मिळवायचे मिळवता सोडायचे ।
आयुष्यास भिडायचे सजग जग जगायचे  ।।३।।

मुले आली मुले गेली मुले येतच राहिली  ।
अखंड ओघीं वाहिली विद्यादानी सुखावली ।।४।।

मुले वाढली मुक्त जाहली पंख पसरुनी झेपावली ।
पिढ्यानपिढ्या हिने मात्र माती जपली आपुली  ।।५।।

जीर्ण झाली फिरुनी बांधली पूर्वीची स्मृतीत गेली  ।
काळ किती सरुनी गेला ओढ हिची ना संपली  ।।६।।

जिंकूनि जगास यावे नी कुशीत  शिरूनी निजावे  । 
मनमाजघरी आजीपरी सतत शाळेने असावे  ।।७।।

मोहवी लोभवी लाघवी हवी हवी लाघवी  हवी हवी  


No comments:

Post a Comment