Saturday, August 26, 2017

श्रीगणेशजी

श्रीगणेशजी हासत , गावत , नाचत , दौड़त आये || धृ || 

रिद्धि सिद्धि गण सहित आनंद मंगल गाये || १  || 

हरसाल इंतज़ार करत आंखोमे आस लगाये || २ || 

वादे मुरादे सपने अपने सफल पुरे हो जाये  || ३  || 

सकल कला सबन विद्या जो चाहे मनसे पाये || ४ || 

शुद्धः आद्य शुद्धः मध्य सफल कार्य कराये  || ५  || 

श्रीगणेशजी हासत , गावत , नाचत , दौड़त आये || धृ || 

राग झिंझोटी 




Friday, August 18, 2017

पदवी विद्यापीठाची आणि लोकपीठाची

निमित्त होते राजर्षी शाहु महाराज  ह्याच्या विषयी लेख वाचण्याचे. शिवाजी हि एकमेव ऐतिहासिक व्यक्ती की ज्याच्या मागे आणि पुढे पदव्या चालत आल्या आहेत. . छत्रपति शिवाजी महाराज  ! राज्याभिषेक प्रसंगी गोब्राह्मण प्रतिपालक क्षत्रिय  कुलवंतस अशी बरीच बिरुदावली होती पण छत्रपति मागे आणि महा'राज पुढे एवढेच शेकडो वर्षे टिकून आहेत. त्या शिवाजी  महाराजांचे वंशज  राजर्षी . हि राजर्षी  पदवी वेदकालीन आहे. गीतेमध्ये जनकादि राजांच्या साठी ती यापारलेली आहे. ब्रह्मर्षी व राजर्षी असा जोडीने उल्लेख येतो. राजर्षी ऋषितुल्य राजासाठी आणि ब्रह्मर्षी ऋषितुल्य ब्राह्मणांसाठी वापरल्या जातात. हि पदवी शाहूमहाराजांसाठी आधुनिक काळात वापरली गेली हि फार मोठी गोष्ट आहे.

काहींना पदवीधर असण्याचा अभिमान असतो. व्दि पदवीधर अधिक अभिमानी असतात. काहीजणांना पदव्यांची लांबलचक माळ अतिप्रिय असते . महाराष्ट्राचे एक माजी मंत्री इतक्या पदव्या ( त्यात अनेक डॉक्टरेट्स पण  आल्या ) इतक्या विद्यापीठातल्या धारण करून  होते की तो सर्व तपशील एका विजिटिंग कार्डावर मावत नसे . आज फक्त माजी मंत्री एवढीच ओळख बाकी आहे.काळाच्या कसोटीवर कुठल्या पदव्या टिकतात आणि कुठल्या विस्मृतीमध्ये जातात हे तपासले तर  लक्षात येते कि लोकांनी प्रेम आणि आदराने दिलेल्या पदव्या टिकून राहतात. स्वतः धारण केलेल्या , कुण्या व्यक्ती किंवा विद्यापीठाने दिलेल्या पदव्या कालांतराने विस्मृतीत जातात. त्या पदव्या फारतर त्या माणसाला त्याच्या आयुष्याइतकी आणि इतकीच साथ देतात . ( रँग्लर परांजपे असे काही अपवाद सोडून ). बऱ्याच पदव्या नोकरी संपादन उद्देशाने मिळवल्या असतात . प्रत्यक्ष कामाचा आणि  पदवीच्या विषयाचा संबंध असतोच असे नाही. ज्ञान  सम्पादन हा उद्देश क्वचितच दिसतो. त्या पदव्या कर्तृत्वाशी निगडित असतातच  असे आढळत नाही .

त्या उलट लोकपीठातून आलेल्या पदव्या . त्या मागून मिळत नाहीत पण आयुष्य संपल्यावरही जात नाहीत.

लोकमान्य हि पदवी टिळकांचीच बापुजी  अणे ह्यासारखे अन्य लोकमान्य नव्हते असे नाही पण लोकमान्य म्हटल्यावर टिळक म्हणायची जरूर नाही असे  एकमेव लोकमान्य म्हणजे बाळ गंगाधर टिळक हेच फक्त.

महात्मा हि पदवी गांधीजींचीच आठवण करून देतात. त्याच्या आधी कुणी महात्मा नव्हते असे नाही. महाभारतात विदुराला महात्मा संबोधिले आहे. गांधीजींचे समकालीन म्हणता येतील असे ज्योतिबा फुलेसुद्धा महात्मा नावाने पारिचीत होते .. पण आजच्या घडीला महात्मा म्हणॆ मोहनदास करमचंद गांधी हीच व्यक्ती डोळ्यापुढं येते.
.
पंडित असंख्य आहेत. काही नावाचे आहेत तर काही जातीचे  आहेत. कोणी स्वतःच स्वतःला पंडित  ठरवून टाकले आहे. काहींना लोकांनी उपहासाने पंडित म्हटलेआहे . तथापि पंडित नंतर काही म्हटले नाही तर ते जवाहरलाल नेहरू हेच समजले जातात.

गंधर्व अनेक आहेत. छोटा असो वा सवाई, कुमार अशी वा नुतन , कितीही प्रसिद्ध आणि गुणी असोत पण हि पदवी सर्वार्थाने सजवली  ती बालगंधर्वानी. नुसते गंधर्व म्हटले कि ते बालगंधर्वच . नारायणराव राजहंस हे नाव आठवत सुद्धा नाही.

 काही आपले नाव हीच पदवीरुपी बनवतात. उदाहरणार्थ   " लता . ", " ब्रॅडमन ". त्यांच्या हयातीतच प्रति लता  किंवा प्रति ब्रॅडमन तयार झाले आणि लयाला गेले.

हे नशीब गुणवंत आणि लोकप्रिय अशांनाच लाभते .त्या सर्व पदवीधरांना मानाचा मुजरा