सांजवेळ
न दुखणारा सांधा नाही ।
जगण्यासाठी वांधा नाही ।। १
नोकरी वा धंदा नाहो ।
जगण्यासाठी वांधा नाही ।। २
हिशेबात फायदा नाही ।
जगण्यासाठी वांधा नाही ।। ३
डोई ठेवण्या खांदा नाहो ।
जगण्यासाठी वांधा नाही ।। ४
बाकी रस्ता साधा नाहो ।
जगण्यासाठी वांधा नाही ।। ५
हाती काठी त्रेधा नाहो ।
जगण्यासाठी वांधा नाही ।। ६
धांगडधिंगा धिं धा नाहो ।
जगण्यासाठी वांधा नाही ।। ७
वृत्त मुक्त छंदा नाही ।
जगण्यासाठी वांधा नाही ।। ८
श्याम झाली चन्दा नाहो ।
जगण्यासाठी वांधा नाही ।। ९
सांजवेळ हि अशीच राहो ।
मुक्त शांतीचा वेध पाहो ।। १०
न दुखणारा सांधा नाही ।
जगण्यासाठी वांधा नाही ।। १
नोकरी वा धंदा नाहो ।
जगण्यासाठी वांधा नाही ।। २
हिशेबात फायदा नाही ।
जगण्यासाठी वांधा नाही ।। ३
डोई ठेवण्या खांदा नाहो ।
जगण्यासाठी वांधा नाही ।। ४
बाकी रस्ता साधा नाहो ।
जगण्यासाठी वांधा नाही ।। ५
हाती काठी त्रेधा नाहो ।
जगण्यासाठी वांधा नाही ।। ६
धांगडधिंगा धिं धा नाहो ।
जगण्यासाठी वांधा नाही ।। ७
वृत्त मुक्त छंदा नाही ।
जगण्यासाठी वांधा नाही ।। ८
श्याम झाली चन्दा नाहो ।
जगण्यासाठी वांधा नाही ।। ९
सांजवेळ हि अशीच राहो ।
मुक्त शांतीचा वेध पाहो ।। १०