Dr. सतीश वैद्य
स. न. वि. वि ,
एक शब्दरूप अनुभव
दिधला हातात जेंव्हा कोमेजलेला श्वास ।
फुंकेल प्राण तेंव्हा धरुनी दृढ विश्वास ।। १।।
येऊ घातला कानात आतला अस्पष्ट नाद ।
कोण कोठूनी कळेना घालीत होते साद ।।२।।
पाहतां पाहणें सोडीत होते नेत्र ।
जाणीव नेणिवेत फिरत होती गात्र ।।३।।
भार्या सुपुत्री मित्र संबधी देत हाक ।
आश्वासित होती येणार देवदूत एक ।।४।।
घेऊनि वैद्य रूप तो देवदूत आला ।
पाठीवरी फिरुनी विश्वात जीव आला ।।५।।
काही उपकार कधीही नसतात फिटावयाचे ।
कधी ना थांबो जाळे उपकार वीणावायचे ।।६।।
धन्यवाद
अरविंद खरे
दि. २८ जानेवारी २०१९
दि. २८ जानेवारी २०१९