Sunday, January 27, 2019




Dr. सतीश वैद्य  
स. न. वि. वि ,
एक शब्दरूप अनुभव 
दिधला हातात जेंव्हा कोमेजलेला श्वास ।
फुंकेल प्राण तेंव्हा धरुनी दृढ विश्वास ।। १।।

येऊ घातला कानात आतला अस्पष्ट नाद ।
कोण कोठूनी  कळेना घालीत होते साद ।।२।।

पाहतां पाहणें सोडीत होते नेत्र ।
जाणीव नेणिवेत फिरत होती गात्र  ।।३।।

भार्या सुपुत्री मित्र संबधी देत हाक ।
आश्वासित होती येणार देवदूत एक ।।४।।

घेऊनि वैद्य रूप तो देवदूत आला ।
पाठीवरी फिरुनी विश्वात जीव आला ।।५।।

काही उपकार कधीही नसतात फिटावयाचे  ।
कधी ना थांबो जाळे उपकार वीणावायचे  ।।६।।

धन्यवाद 
अरविंद खरे 
दि. २८ जानेवारी २०१९



No comments:

Post a Comment