Sunday, February 14, 2016

हरीचिया द्वारी

हरीचिया द्वारी व्हावे हरीची पायरी
तेथे म्या पामरे मग करावी चाकरी     ll १ ll

लागेल गा तेथे संत चरण धूळ
तिला पाहुनी मज आठवेल माझे मूळ   ll २ ll

पाय धरोनिया हाती धूळ लावीन ललाटी
जणू माय आली भेटी दूर लेकराच्या साठी   ll ३ ll

मूळ मायेस स्मरावे तेणे हरिदास व्हावे
प्रौढपणाचे ओझे उगा माथा का वहावे ?   ll ४ ll

धुळीमाजी धुळीकण करी मोजदाद कोण ?
एका मातीचेच सारे तुम्ही आम्ही देवगण   ll ५ ll

जाऊ देवाचिया द्वारी सुखे ओलांडू पायरी
राहू होऊ देवापरी अहंकार हद्दपारी    ll ६ ll 

1 comment: