आषाढी एकादशीच्या निमित्ताने एक कविता
मन पंढरीच्या वाटे जाई उडत उडत
भव चिंता क्रोध शीण मागे पडत पडत [१]
मन पंढरीच्या वाटे गाई विठ्ठल विठ्ठल
दर्शनाच्या पांडुरंगा कस उठल उठल [२]
मन पंढरीच्या वाटे होई वैष्णव वैष्णव
हात्भागियांची करी कीव कणव कणव [३]
मन पंढरीच्या वाटे वाजविते टाळी टाळी
म्हणे पांडुरंगा बाबा तुझी माझी एक आळी [४]
मन पंढरीच्या वाटे करी मुक्काम मुक्काम
विसावल्या वाटसरा म्हणे राम राम राम [५]
मन पंढरीच्या वाटे चाले पाऊल पाऊल
काम क्रोध मद मोह मागे सारील सारील [६]
मन पंढरीच्या वाटे मागे अंती सोय सोय
भक्ताला या आतुरल्या म्हणा देवा होय होय [७]
मन पंढरीच्या वाटे जाई उडत उडत
भव चिंता क्रोध शीण मागे पडत पडत [१]
मन पंढरीच्या वाटे गाई विठ्ठल विठ्ठल
दर्शनाच्या पांडुरंगा कस उठल उठल [२]
मन पंढरीच्या वाटे होई वैष्णव वैष्णव
हात्भागियांची करी कीव कणव कणव [३]
मन पंढरीच्या वाटे वाजविते टाळी टाळी
म्हणे पांडुरंगा बाबा तुझी माझी एक आळी [४]
मन पंढरीच्या वाटे करी मुक्काम मुक्काम
विसावल्या वाटसरा म्हणे राम राम राम [५]
मन पंढरीच्या वाटे चाले पाऊल पाऊल
काम क्रोध मद मोह मागे सारील सारील [६]
मन पंढरीच्या वाटे मागे अंती सोय सोय
भक्ताला या आतुरल्या म्हणा देवा होय होय [७]
No comments:
Post a Comment