झोळी
जीर्ण माझी झोळी देवा आर्ततेनी आणली रे l
रंग संग नि ढंग करिता दिवस रात्र गेली रे ll धृ ll
मायबापे वस्त्रे दिधली जोडीत जोडी शिवली रे l
आशा पाशे चिकटवली अस्तरे आत लाविली रे ll
कधी ठिगळे कधी टाके माया धागे विणली रे II १ II
रंग देवूनी झालरुनिया सजव सजव सजली रे I
सुख दुख्खे भर भरुनी ताणत ताणत नेली रे II
हाती खांदी वागवली डोईवर कधी घेतली रे II २ II
जिथे गेलो तिथे नेली क्षण एक न विसरली रे I
झोळी न माझी मी झोळीचा उरफाट कशी हि झाली रे II
फाटली आणि उसवली आणली करून खाली रे II ३ II

No comments:
Post a Comment