Wednesday, August 5, 2015

स्वानुभव 

सजग जग जगसी आणि घेई जगदानुभावा  l 
अहमिदस्य स्फुरणे ज्याचा वितरे भेदभावा ll १ ll
विस्ताराच्या मुळी जयाच्या नसे अंत वा पार l 
रूप वर्णाच्या छटा पाहता होत नेत्र विस्फार ll २ ll
मिटुनी डोळे विश्व मावळे ध्यान धरुनी स्थिर l 
मिटत मिटत सृष्टि जाता अंतरंग उजळणार ll ३ ll
स्वतःच उजळे स्वतः न पाहे आश्चर्य असे हे फार l 
कोडे असले कसले अद्भुत कोण कसे उलगडणार ll ४ ll
गती थांबली मति खुंटली मनही कधीच मेले 
जगही गेले जागा गेली मागे काय ते उरले ll ५ ll
कसे सांगू नि किती सांगू मंद बंद चौखरि 
अनहत नाद स्वतःच ऐके स्वतःच बा  अंतरी ll ६ ll





No comments:

Post a Comment