झोपाळ्यावरचे गीत
पुरे पुरे रे गोपाळा । थांबवी हा हिंदोळा ।।
जीव कसा गरगरला । अफाट तुझी ही लीळा ।।१।।
नि:शंक राहू दे अबला । तंव कवेत स्थिरवी मजला ।
क्षण क्षणात लागे बदला । भ्रम दिसतो इथला तिथला ।।२।।
हौस आता ही फिटली । परत वाट दिसू लागली ।
जाइन जिथे मी एकली । आठवीत तुझी रे मुरली ।।३।।
वाटते परत मी यावे । तुज संग परत झुलावे ।
अलगद उचलुनी घ्यावे । तुझेच तुजला द्यावे ।।४।।
किती जन्म तुजसवे राहो । पसरून मिठीत घे बाहो ।
विसरुनी मी मजला हो । गतीत स्थिती जाणा हो ।।५।।

No comments:
Post a Comment