Sunday, February 5, 2017

TUKARAM : kAI KARU MAN ANAVAR

शब्द 
माझे मज येति कळों अवगुण ।  काय करू मन अनावर ।। १।।
आता आड उभा राहे नारायणा । दयासिंधुपणा साच करी ।।२।।
वाचे वदे परी करणे कठीण  । इंद्रिया वळण नाही  देवा  ।।३।।
तुका म्हणे जैसा तैसा तुझा दास । न करी उदास मायबापा ।।४।।

भावार्थ 

स्वतः मधल्या कमजोरीची प्रांजळ कबुली देऊन देवाला शरण जाणे हा एक भजनाचा भाव बऱ्याच ठिकाणी दिसून येतो.. " अमृताहुनी गोड नाम तुझे देवा मन माझे केशवा का बा  न घे ? " हि नामदेवांची रचना सहज आठवून जाते. इथेही तुकाराम महाराज असाच हताश भाव दाखवतात .  " कळणे" बुद्धीचा गुण आहे तर "करणे "" मनाच्या उर्मीवर अवलंबून असते. बुद्धीला जो अवगुण वाटतो तो मनाला मानावासा वाटतं नाही . बुद्धीने मनावर नियंत्रण ठेवणे हि अध्यात्मिक प्रगतीची अपरिहार्य अशी  पहिली पायरी  आहे.

प्रश्नाने अभंगाची सुरवात झाली आहे. मला माझ्यातील अवगुण बुद्धीने कळले आहे पण मन अनावर आहे  मग आता मी काय करू ?  खरे तर काय करू ह्याचे  उत्तर माहित नाही असे नाही पण ते बुद्धीला माहित आहे.. मनाने ते  स्वीकारून वर्तनामध्ये / कृतीमध्ये उतरवणे होत नाहीये असा हा हताश भाव आहे.

 मनाच्या अनावर उर्मीप्रमाणे वाटेल तसे वागण्याच्या आड ( आडवा ) ये असे नारायणाला साकडे घातले आहे. हे आडवे येणे म्हणजे एक प्रकारची दयाच असून ती तू केली नाहीस तर तुला दयासिंधु कसे म्हणावे ?  आपला दयासिंधुपणाचा लौकिक खरा करण्यासाठी तरी ये अशी हि एक पेचदार प्रार्थना आहे.

पुढल्या चरणामध्ये उक्ति आणि कृति यातील फरक दाखवला आहे   " बोले तैसा चाले " हे आपणच दुसरीकडे म्हंटले आहे त्याप्रमाणे घडण्यासाठी मनाच्या बरोबर ( किंबहुना आधी )  इंद्रोयांनाही वळण लागले नाही अशी प्रांजळ कबुली दिली आहे. म्हणजे इंद्रियांच्या वर मन आणि मनाच्या वर बुद्धि असा तर तम  भाव दाखवला आहे.
 शेवटी सर्व वकिली युक्तिवाद सोडून देऊन जसा आहे तास तुझे दास झालो आहे आता उदास म्हणजे निराश करू नकोस अशी संपूर्ण शरणागती दाखवत अभंगाची समाप्ति केली आहे.

सरगम 
राग नायकी कानडा ,  ताल  भजनी ठेका
स्वर रचना  : अरविंद खरे

निं  ।  निं   सा   रे   म   । प   निं  म  प  ।   रे   म   रे  सा  । रे   -   सा   -  ।
मा  ।   झे    s    म   ज  ।  ये    s   ति  s  ।   क  ळो  अ  व  । गु   s   ण   s ।
निं   सा   रे   प  ।  म  -  म   -  ।  निं   सा   रे   -  ।  रे  -  सा   -   ।
का   य   क  रु   ।  म   s  न   s  ।  अ   ना   s    s  ।  व  s   र    s   ।


म   प   रे   म  ।  निं   -   निं  -   ।   निं  निं   रें    रें ।  सां   सां   रें    सां    ।
वा   चे  व   दे  ।   प    s    री    s ।   क   र     णे   s ।  क    ठी    s    ण     ।
निं   रें  सां   रें  । निं  सां   निं   प  ।  गँ  -  गँ    म   ।  रे    -   सा   -   ।
इं   द्री    या  व ।   ळ   s     ण   s  ।   ना  s  ही  s    ।  दे   s    वा   s    ।।३।।

अंतर २ आणि ४ वरीलप्रमाणे



   -




 






 





   



No comments:

Post a Comment