घन पांडुरंग ओला । प्रेमभावे ओथंबीला ||
झरझर बरसत आला । चिंब कृपेने केला ।।१।।
दाटुनी आलिया आंस । वर्षाव करील हा खास ।
दग्ध भूमीचा वास । तोषवाया ये मनास ।।२।।
नित नेमाची मशागत । पेरी बियाणं नामांकित ।।
आलं टरारूनिया शेत | रहा खुशालपणे निवांत ।।३।।
सर्व सरली धावाधाव । काई नुरली मनास हाव ।।
तुचि आनंदाची ठेव । आम्ही जाळू भेदभाव ।।४\।।
आता काय मागणे मागू । तुज काय गाह्राणे सांगू ||
तुझे तुलाच देणे लागू । तुझे पायीच मुक्ति मागू ।।५।।
तुझे रुपी एकरूप व्हावं । सार्थकी जीवन लागावं ।।
मग कशास उरला वाव । आम्ही भक्त तरी तू देव ।।६।।

No comments:
Post a Comment