कानडा राजा पंढरीचा
वेदांनाही नाही नाही कळला अंत पार ज्याचा । कानडा राजा पंढरीचा ।।धृ ।।
निराकार तो निर्गुण ईश्वर । कसा प्रगटला असा असा विटेवर ।।
उभय ठेवले हात कटीवर । पुतळा चैतन्याचा ।। १ ।।
परब्रह्म हे भक्तांसाठी । उभे ठाकले भीमेकाठी ।।
उभा राहिला भाव सावयव । जणू की पुंडरिकाचा ।। २ ।।
हा नाम्याची खीर चाखतो । चोखोबांची गुरे राखतो ।।३।।
पुरंदराच्या हा परमात्मा । वाली दामाजीचा ।। ३।।
सरगम
राग : मिश्र मालकौंस : स्वर ग ध नि कोमल सा आणि म शुद्ध : ताल भजनी ठेका
सा ग म ध । ध - ध - ।। ग म ध नि । नि नि नि - ।।
वे दा - । ना - ही - ।। ना - ही - । क ळ ला - ।।
ध ध नि नि । सां नि सां - ।। सां - नि सां । नि सां सां - ।।
अं त पा र । ज्या - चा - ।। का - न डा । रा - जा - ।।
ध म ग म । धनी सां सांनी ध ।। नि सां सां - । ध म ग सा ।।
पं ढ रि चा । का- - न - डा ।। रा - जा - । पं ढ रि चा ।। धृ ।।
ग - म ध । - ध म सा ।। सा ग म ध । ध - ध ध ।।
नि - रा का । - र तो - ।। नि र गु ण । ई - श्व र ।।
ध ध - ग । म ध म - ।। ग म म ध । म - म म ।।
क सा - प्र । क ट ला - ।। अ सा - वि । टे - व र ।।
ध ध ध ध । ध नि सां सां । ध - म ग । ग म प प ।।
उ भ य ठे । वि ले - - \\ हा - त क । टी - व र ।।
म नि नि - । नि ध म - । ध सां सां - । म धनि निसा - ।।
पु त ळा - । चै - त - ।। न्या - चा - । - -- -- - ।।
सां - नि सां । नि सां सां - ।। ध म ग म । धनी सां सांनी ध ।।
का - न डा । रा - जा - ।। पं ढ रि चा । का- -- न - डा ।।
नि सां सां - । ध म ग सा ।।
रा - जा - । पं ढ रि चा ।। १।। .
दुसरे कडवे पहिल्या प्रमाणे ।। २ ।।
सां - सां - । सां सां सां ध ।। ध नि सां - । सां सां सां - ।।
हा - ना - । म्या - ची - ।। खि - र - । चा - ख तो - ।।
नि - नि - । ध नि ध म ।। ध नि - नि । सां गं सां - ।।
चो - खो - । बा - ची - ।। गु रे - रा । - ख तो - ।।
ध नि - नि । ध नि प - ।। ध - म ग । प - प - ।।
पु रं - द । रा - चा - ।। हा - प र । मा - त्मा - ।।
म - नि नि । नि ध म -।। ध - सां सां । म धनि निसा - ।।
वा - ली - । दा - मा - ।। जी - चा - । - -- -- - ।।
सां - नि सां । नि सां सां - ।। ध म ग म । धनी सां सांनी ध ।।का - न डा । रा - जा - ।। पं ढ रि चा । का- -- न - डा ।।
नि सां सां - । ध म ग सा ।।
रा - जा - । पं ढ रि चा ।।३।। .
वारकरी संप्रदायाच्या मान्यते नुसार पांडुरंग हे निर्गुण परब्रह्माचे सगुण रूप आहे . परब्रह्म ह्या विषयावर वेदसुद्धा " हे नाही , हे नाही " असेच म्हणतात . म्हणून कानडा पंढरीच्या राजा वेदांना अंत आणि पार कळला नाही असा आहे असे सांगून टाकतात. ( अंत आणि पार हे साकार गोष्टीलाच संभवतात)
तेच निराकार आणि निर्गुण अश्वराचे रूप चैतन्याचा पुलाला बनून कटीवर हात आणि विटेवर पाय ठेऊन चैतन्याचा पुतळा बनून उभे आहे हे सर्व परिचित रूपाचे वर्णन पहिल्या कडव्यात करतात. भक्ती हे अशा तर्हेने ज्ञाना साठी पूर्व आणि उत्तर असे दोन्ही काळात करावयाचे साधन मानतात
हे निराकार निर्गुण अस्तित्व भक्तांच्या आकलनासाठी आणि भक्तीला सुलभ असे भाव ( मनाचा गन )आणि अवयवांसह ( शरीराचा गुण ) परम भक्त पुंडरिकाच्या सोयीसाठी कटीवर हाथ आणि विटेवर पाय असे उभे आहे हे सांगतात . भक्त पुंडरिकाचे चरित्र ह्या रूपात सर्वंकष रीतीनेद्वितीय कडव्यात उभे केले आहे.
तिसरे कडवे नामदेव, चोखोबा पुरंदर अशा काही भक्तां च्या चरित्राचे संक्षिप्त वर्णनासाठी वापरले आहे ते सामान्य भक्तांनाही स्फुरणदायी व्हावे हा सुप्त हेतू. भक्त आणि ईश्वर डोभानंही एकेरी संबोधन वापरले आहे. ते संबंधाची जवळीक दाखवणारे आहे.
