Wednesday, August 28, 2013

जन्माष्टमीच्या शुभेच्छा

हाकारिता आयुष्य गेले साद कशी येईना 
काय चुकले कमी पडले काहिचकी कळेना 

अवचित कळले हाकारीत होतो मीच माझे मला 
कशास केला मज वेगळा कृष्णा असा मी तुला 

मीच राधा मी सुदामा मेळा मीच गोपाळांचा 
उतरंडीचा खेळ कृष्णा एकरूप दोघांचा 

पडणे, चढणे, हंडी फोडणे अवघ्या तुझ्या लीला 
ठेव आम्हा त्या पायरीवरी जिथे पहावे तुला

परतोनी यावे फिरुनी पहावे पुन्हा रमावे तुवा 
खेळ काळांतरी चा  आम्हा असाच चालू हवा

तुच आरंभी तुच शेवटी तुच तू आधी मधीही  
तुझ्या वीना कोणी नाही कुठे आणि केंवाही 

No comments:

Post a Comment