Friday, March 21, 2014

पंच तत्वाची रंग पंचमी



फिरुनी झाले रंग आले फिरुनी आली पंचमी 
विसरुनी गेले होते सणाला या देशीचे आदमी  
पुन्हा नवाळी फुटो वसंत उत्सवा या देशीच्या 
रंग घ्या शोधूनी आपण आपल्या आवडीच्या  
संग शोधू रंग घेउनि  दंग होऊ या जगतात  
आरपार रंग त्वचेच्या दुसरे रंग मिसळू द्या 
कोण आपण कसे होतो ते जसे तसेच राहू द्या 
सर्व रंगाचा एक काला रूप एकरूप होऊ द्या 
अवघे रंग एक होता दुजेपणा विसरुनी जा 
मित्र गोत्र नाती जाती मूळ ओघात येऊ द्या 
होऊ दे विराट माणूस विराट एकवट होऊनी 
तसाच असेल विराट पुरुष नि विराट जननी 
बनवत जाती प्रजाती ची नवनवी निर्मिती 

No comments:

Post a Comment