Wednesday, March 19, 2014

श्वास आहे तर देह आहे , नाहीतर रिक्त पिंजरा ll १ ll 
वस्ती तिथे घर आहे , नाहीतर नुसता  निवारा ll २ ll 
संस्कृतीचे  नगर आहे , नाहीतर रस्ते फिरती गरारा ll ३ ll 
जनहित तेथे राज्य आहे , नाहीतर विलास सारा ll ४ ll 
भाव असेल तर देव आहे , नाहीतर ढोंग ढिगारा ll ५ ll 
अर्थ असेल तर शब्द आहे , नाहीतर केवळ वारा ll ६ ll 
जीव असेल तर विश्व आहे , नाहीतर नित्य पसारा ll ७ ll 
सर्जन तेथे भविष्य आहे , नाहीतर खलास खेळणारा ll ८ ll 




No comments:

Post a Comment