Saturday, September 13, 2014

आम्ही आणि तुम्ही

आम्ही आणि तुम्ही 


नका विचारू आम्ही कोण 
आम्ही तुम्ही नसती दोन 

अमुच्यापासून फुटून निघता 
उलटा जाब पुन्हा विचारता 

आधी जन्मा आलो आम्ही 
तेंव्हा कोठें दिसला तुम्ही 

कुणी कुणाची करावी खंत 
तुमचा अमुचा एकच अंत 

1 comment:

  1. बैसलोंसे दारीं । धरणें कोंडोनि भिकारी ॥1॥ आतां कोठें हालों नेदीं । बरी सांपडली संदी

    ReplyDelete