Sunday, June 5, 2016

विठ्ठला त्रिवार वंदन तुला

विठ्ठला त्रिवार वंदन तुला ।
अंतर्बाह्य जना मनासी व्यापून तु राहिला  ।
विठ्ठला त्रिवार वंदन तुला ।। धृ  ।।

पुंडरीकाने तुला रोखिला  ।
भिमाकाठी तुहि तिष्ठला  ।।
काय उणे पाहिले म्हणुनि मजला नच पातला ।। १ ।।

समचरणी जरी तुला पाहिला  ।
तेढा मी  तरी अंतरी राहिला  ।।
काय सांगू कुणा फसविला  मी मजला की  तुला  ।। २ ।।

आंस माझी कुठे करपली  ।
सहवासाची भूक खुंटली  ।।
मागे तरीहि जात न पावली इतुका तू भावला  ।। ३ ।।

पश्चातापी  भीमा भागा  ।
वळवून नेईन मी अंतरंगा  ।।
तेथे तुही येशील अंगा आलिंगुनी अंकिला  ।। ४ ।।

शब्दरचना ४-६-२०१६

No comments:

Post a Comment