Sunday, April 22, 2018

सांजवेळ ( Twilight )

सांजवेळ 
न दुखणारा सांधा नाही  ।
जगण्यासाठी वांधा नाही  ।। १
नोकरी वा धंदा नाहो  ।
जगण्यासाठी वांधा नाही  ।। २
हिशेबात  फायदा नाही ।
जगण्यासाठी वांधा नाही  ।। ३
डोई ठेवण्या खांदा नाहो  ।
जगण्यासाठी वांधा नाही  ।। ४
बाकी रस्ता साधा नाहो  ।
जगण्यासाठी वांधा नाही  ।। ५
हाती काठी त्रेधा  नाहो  ।
जगण्यासाठी वांधा नाही  ।। ६
धांगडधिंगा धिं धा  नाहो  ।
जगण्यासाठी वांधा नाही  ।। ७
वृत्त मुक्त छंदा नाही  ।
जगण्यासाठी वांधा नाही  ।। ८
श्याम झाली चन्दा नाहो  ।
जगण्यासाठी वांधा नाही  ।। ९
सांजवेळ हि अशीच राहो ।
मुक्त शांतीचा वेध पाहो ।। १०

No comments:

Post a Comment