दिग्देशकालाद्यनपेक्ष्य सर्वगं शीतादिह्रुन्नित्यसुखं l
यः स्वात्म्तीर्थ भजते विनिष्क्रियः स सर्ववित्सर्वगतोSमृतो भवेत् ll
आत्मबोध शेवटचा श्लोक
आदि शङ्कराचार्य ll
मराठी काव्यरूप
आता कुठे जाणार नाही, जायला कुठची दिशा नाही l १l
तरी कुठे थांबणार नाही, कारण थांबण्याला जागा नाही l २l
उन पाऊस थंडी वारा , कशास थारा उरला नाही l ३l
कसला डाग कसले दुखः , सुखास पारावार नाही l ४l
संकल्पाची उर्मि सरली , करू काहीसे उरले नाही l५l
मीच सर्वदूर फाकलो , सर्व कवेत घेउनी बसलो l६l
मीच यात्रा मीच तीर्थ , मीच मजला गिळूनी बसलो l७l
आता द्यानरूप झालो , आता मी अमृत झालो l ८l
आता मी अमृत झालो, आता मी अमृत झालो ल l ९l
No comments:
Post a Comment