आलिया भोगासी असावे सादर l देवावरी भार घालूनिया ll १ ll
मग तो कृपासिंधु निवारी साकडे l येर ते बापुडे काय रंक ll २ ll
भयाचिये पोटी दुख्खाचीया राशी l शरण देवासी जाता भले ll ३ ll
तुका म्हणे नव्हे काय त्या करिता l चिंतावा तो आता विश्वंभर ll ४ ll
तुकारामांच्या ज्या रचनांना म्हणींचे रूप प्राप्त झाले आहे त्या पैकी ह्या अभंगाचा पहिला चरण आहे . अशी अनेक उदाहरणे दाखवता येतिल.
सर्व सामान्य माणसे दुखः आणि पीडा यांनी त्रस्त झाली की हा चरण म्हणतात . एक असहायता प्रगट करण्याची ही जणू रीतच झाली आहे . प्रत्यक्षात तुकाराम महाराज निराश न होण्यासाठी उपाय सांगत आहेत देवावर भार घातला की आपली सहनशक्ती वाढते . देवाशिवाय अन्य कोणी दुखः निवारण करायला समर्थ नाही . देब परिस्थिति तरी बदलेल किंवा आहे ती परिस्थिति स्वीकारायचे सामर्थ्य देईल . देवाला शरण गेल्यावर तो कृपा करणारच कारण तो कृपासिंधु अहे. इतर म्हणे येर तेवढे शक्तिमान नाहीत म्हणून बापुडे . मुळात दुखः भयापोटी निर्माण होते. भय काहीतरी गमावण्याच्या शक्यतेमुळे निर्माण होते. मग ते धन असो मान असो व जीवित. हे काहीही आपले नसताना आपण ते आपले मानतो आणि गमावण्याची भीती बाळगतो . " सर्व काही देवाचे " हा भाव धरिला की देवाचे होते ते देवापाशी गेल्याची भीती कशाला ? भीती नाही तिथे दुखः नाही .
तुकाराम महाराज म्हणतात की व्यर्थ काही न करता विश्वंभराचे चिंतन करावे . " विश्वंभरे विश्व सामावले पोटी , तेथेच शेवटी आम्ही असु " असे दुसरीकडे महाराजांनी सांगितले आहे . जगाचे कल्याण करतो तो आपलेही करणारच . आपण स्वतःच स्वतःचे कल्याण काय हे ठरवायचे कशाला ? तो भार ज्याचा आहे त्याच्यावर ठेवावा म्हणजे आपण मुक्त होऊन जाऊ .

Very nice
ReplyDelete