देव म्हणे नाम्या पाहे
देव म्हणे नाम्या पाहे । ज्ञानदेव मीच आहे ।। १ ।।
तो आणि मी नाही दुजा । ज्ञानदेव आत्मा माझा ।। २।।
माझ्या पायी ठेवी हेत । सोड खंत खंडी द्वैत ।। ३।।
नाम्या उमज मानसी । ऐसे म्हणे हृषीकेशी ।। ४।।
अन्वय
संत नामदेवांचे संवादात्मक असे बरेच अभंग आहेत त्या पैकी हा एक होय .प्रसंग आहे ज्ञानेश्वर समाधी नंतर आळंदीहून पंढरपुरास परत येण्याचा. समकालीन म्हणून संत नामदेव त्या वेळेस आळंदीत उपस्थित आहेत. समाधी सोहळ्याचे वर्णन करणारे बरेच अभंगत्यांनी लिहून ठेवले आहेत. समाधी नंतर नामदेवाचा जीव कासावीस झाला आहे आणि ते प्रत्यक्ष पांडुरबागला साकडे घालतात कि मला पुन्हा ज्ञानेश्वरांचे दर्शन घडवा तरच मत पंढरीला परत येईन. " तरीच येईन पंढरीस द्रुष्टी देखेन ज्ञानेश " असे एका अभंगात त्यांनी लिहून ठेवले आहे. नामदेवांची समजुत घालण्यासाठी प्रत्यक्ष पांडुरंग त्यांच्याशी बोलत आहे अशी ह्याची रचना आहे.
देव नामदेवांना म्हणतात माझ्यातच ज्ञानेश्वर पहा. तो आणि मी वेगळे नाहीत . माझा आणि ज्ञानेश्वरांचा आत्मा दोन नसून एकाच आहे. आता वियोगाची खंत सोड आणि माझ्यापाशी तुझे ध्येय ठेव . दोन वेगळे भासवणाऱ्या द्वैताला संपवून टाक . मनाची अशी एकतानता उमजून घे असे हृषीकेश म्हणतात.
असा वारकरी संप्रदायाचा अद्वैतवाद सिद्ध करणारी तरीहि विलक्षण हृदयंगम अशी हि रचना आहे.
सरगम राग दुर्गा ताल अध्धा
रे ध - प । ध - प - । प ध म - । प म रे - ।
दे व - म्ह । णे - - - | ना - म्या - । पा - हे - ।
सा - रे रे । ध सा सा - । ध - सां सां । ध सा धप म ।
ज्ञा - - न । दे - व - । मी - - च । आ - हे - - ।। धृ ।।
३ x २ o
ध - म प । ध सा सा - । ध सां रें सां । ध - प - ।
तो - आ - । णी - मी - । ना - ही - । दु - जा - ।
ध - ध - । प ध म _ । म प प ध । म रे सा - ।
ज्ञा - न - । दे - व - । आ - त्मा - । मा - झा - ।। १ ।।
दुसरे कडवे पहिल्या प्रमाणे ।। २ ।।
ध प ध - । निं निं निं - । प - निं ध । मप धनीं प - ।।
ना - म्या - । उ म ज - । मा - न सी । -- -- - - ।।
ध - ध - । प ध म - । म प म रे । सा रे सा - ।।
ऐ - से - । बॊ - ले - । ह्र षी के - । शी - - - ।। ३ ।।

No comments:
Post a Comment