शब्द रचना
तुकाराम महाराज
आम्हां विष्णुदासा हेचि भांडवल । अवघा विठ्ठल धन वित्त ।।१।।
हे ती काही घेणे नलगिये हाते । करोनिया चित्ते समाधान ।।२।।
तुका म्हणे द्रव्य मी;मेळविले मागे । हे तो कोणा संगें आले नाही ।।३।।
सरगम
राग रागेश्री ताल भजनी ठेका
संगीत आणि गायक : अरविंद खरे
म । ग म म म । रे - सा - । सा ध निं ग । ग व - म ।
आ । म्हा s वि ष्णु । दा s सा s । हे चि s भां । ड व - ल ।
गम । ग ग म ध । म - म - । ध ध निं सां । निं - ध - ।
अव । घा s s वि । ठ्ठ - ल - । ध न s s । वि s त s ।
म । ग म म म । रे - सा - । सा ध निं ग । ग व - म ।।१।। किंवा ( म म ग म )
आ । म्हा s वि ष्णु । दा s सा s । हे चि s भां । ड व - ल । । १।। ( ड व ल आ )
० x ० x ( जोडण्यासाठी )
ग म निं ध । सा - सा - । निं सां रें सां । निं - ध - ।
हे तो कां हि । घें s णे s । न ल गी ये । हा s तें s ।
ध ध ध ध । ध निं - ध । ग - ग म । रे - सा - ।
क रो नि या । चि s त्तें s । स s मा s । धा s न s ।। २।।
० x ० x
तिसरा चरण दुसऱ्या प्रमाणे
भावार्थ
संत तुकाराम वाणी समाजातून आले हे सर्वश्रुत आहे. . इतर संतांप्रमाणे त्यांनीही आपल्या व्यवसायातील उदाहरणे देत देत भक्तिभावाची मांडणी केली आहे . " देवा तुझा मी सोनार " किंवा " आम्ही वारिक वारिक करू हजामत बारीक " अशी उदाहरणें सहज सामोर येतात . जातीव्यवस्था माणुसकी ना सोडता जपणारा असा तो समाज होता. तो पुढे बिघडला ही इतर गोष्ट.
तुकाराम महाराजांनी धन, वित्त, देणें , भांडवल, द्रव्य अश्या पारिभाषेतून आपले म्हणणे मांडले आहे. अर्थ शास्त्रातील सर्व संज्ञा अतिशय चपखलपणे उपयोगात आणल्या आहेत. त्या शिवाय पारंपरिक सैद्धांतिक सुद्धा वापरल्या आहेत. हे सर्वे करताना कुठे हि आपण बुद्धिमान असण्याचा दर्प नाही. उलट भक्तिभावातून येणार नम्रपणा अतिशय ह्रदयपणे सामोरा येतो .
पहिल्याच चरणातून ते आपली ओळख विष्णुदास म्हणून देतात. हरीचा दास तो हरिदास तसा विष्णुचा दास तो विष्णुदास . पांडुरंग हा कृष्णाचा अवतार मानल्यामुळे तो आपोआपच विष्णूशी जोडला जातो. कृष्ण भक्तीची तुळशीमाळ आदी चिन्हे वारकरी अभिमानाने धारण करतात. नरसी मेहताने त्या विष्णुदासांची आंतरिक ओळख " वैष्णव जन तो तेणें कहिये " ह्या सुप्रसिद्ध रचनेतून समाज मनावर बिंबवली आहे. इथे विष्णुदास ह्या शब्दाच्या आधीचा "आम्हा " हा शब्द हा फक्त आदरार्थी बहुवचनी मानायचे कारण नाही. तो संख्यार्थी बहुवचनी मानायला काही हरकत नाही. अशी आपली ओळख सांगितल्यावर हा वाणी आपले भांडवल , धन आणि वित्त ( capital and wealth ) हे सर्व एकत्र करून ते सगळे " विठ्ठल " ह्या एका शब्दातून व्यक्त करतात.
व्यावहारिक जगामध्ये धन, वित्त, भांडवल ह्या हाताळायच्या गोष्टी आहेत . नोटा नाणी मोजाव्या लागतात. सोने तोलावे लागते. हे हस्त स्पर्शाशिवाय शक्य नाही . विठ्ठलाचे तसे नाही. तो हस्त स्पर्ष न' करताही वापरता येतो. त्यासाठी एकाच अट महाराज सांगतात .ती म्हणजे चित्ताची समाधानी अवस्था असण्याची.
सांगायला सोपी पण मिळवायलाअतिशय कठीण अशी अट सांगितली आहे. संसारात राहून संसारात ना अडकण्याची हि गुरुकिल्ली आहे.
हे काही एका जन्माचे काम नाही . सतत करायची साधना आहे हे " द्रव्य मिळविले मागे " अशा संकेताने सांगतात. मागे म्हणजे किती मागे ? मागील क्षण असू शकतो किंवा मागील अनंत जन्म असू शकतात. साधनेचे फळ म्हणून चित्ताचे समाधान प्राप्त होते . हे कोणी कोणाला देऊ घेऊ शकत नाही ." उधारी बंद नगद चालू " अशी हि रोख ठोक व्यवस्था आहे. ती स्वतःच मिळवावी लागते असे प्रतिपादन करून अभंगाची सांगता केली आहे.
मोजक्या शब्दांतून प्रचंड अवाक्याची गोष्ट सांगण्याची तुकाराम महाराजांची अति विलक्षण अशी हि रचना आहे

No comments:
Post a Comment