Monday, July 23, 2018

विठू s s , विठोबा s , विठुराया ।

विठू s s , विठोबा s , विठुराया ।
उभा विटेवरी । कर हे कटावरी । पाहावे डोळाभरी । देवा या  ।।

लक्ष  पाऊले चालावी ।  आंस जीवींची पुरवावी ।।
उभा विटेवरी । कर हे कटावरी । पाहावे डोळाभरी ।  देवां या  ।। १।।
पंढरी क्षेत्र हे पावन  ।  पुंडरिकाचे जे निधान ।।
उभा विटेवरी । कर हे कटावरी । पाहावे डोळाभरी ।  देवां या  ।।२।।
चंद्रभागा नदी स्नान  ।   अखंड नामाचे  कीर्तन ।।
उभा विटेवरी । कर हे कटावरी । पाहावे डोळाभरी ।  देवां या  ।।३।।
पायां  लागती, उरी भेटती  । मनाच्या गांठीं सैल करती  ।।
उभा विटेवरी । कर हे कटावरी । पाहावे डोळाभरी ।  देवां या  ।।४।।
माथा टेकती , गूज सांगती  ।   दर्शने सुखताती यदुराया  ।।
उभा विटेवरी । कर हे कटावरी । पाहावे डोळाभरी ।  देवां या  ।।५।।
विसरुनी जाती वेगळी नाती  ।  अवघी सारी एकचि होती  ।
उभा विटेवरी । कर हे कटावरी । पाहावे डोळाभरी ।  देवां या  ।।६।।
आमुचा ज्ञानोबा आमुचा विठोबा ।  अखिल संतांची केवढी किमया ।
उभा विटेवरी । कर हे कटावरी । पाहावे डोळाभरी ।  देवां या  ।।७।।
जोवरी नाही होत युगांत । तोवरी चालो अखंड हे व्रत ।
उभा विटेवरी । कर हे कटावरी । पाहावे डोळाभरी ।  देवां या  ।।८।।
येतांचि मूळ टाकूनी देहो  ।  खेद ना खंत शांतीच राहो  ।
उभा विटेवरी । कर हे कटावरी । पाहावे डोळाभरी ।  देवां या  ।।९।।
एवढे मागणे नाही बा फार । राहतो स्वस्थ टाकुनी भार  ।
उभा विटेवरी । कर हे कटावरी । पाहावे डोळाभरी ।  देवां या  ।।१०।।

1 comment:

  1. Titanium White Dominus Price & Returns - TITADIA 2021
    TITADIA GOLDEN titanium pipe TIGER is a luxury titanium belly rings metal playing table, and also a tableau. It is a true gemstone gemstone from oakley titanium glasses the Yossi-Ararat titanium magnetic era in 2017 ford fusion energi titanium Turkey,

    ReplyDelete