Wednesday, March 1, 2017

SOME CROP SOME DROP

काही पीक काही तण
काही लावले काही उगवले
काही वाढवले काही असेच वाढले
काही राखले काही तुडवले
काही आवडले का अवघडले ?
काही बिघडले का बिघडवले ?
काही आखीव रेखीव
काहींची सुसाट धाव
कुठे जाण्या निघालो
कुठे जाऊन पोचलो
कापणीत पीक गेले
तण मातीत राहिले
आज घेतले हातात
तेही जाणार मातीत
पुन्हा पीक पुन्हा तण
चाले अखंड नागवणं
भावार्थ
माणूस काही करायला जातो ते तसेच होते असा अनुभव नाही. तास नियमहि नाही. प्रसंग होता मिलिंदच्या आयोजित केलेल्या शहर रचनेच्या विषयावरच्या परिसंवादाचा. शहराचं उभे राहणे हि घराच्या / निवासाच्या मुलभूत गरजेचे स्वयंसिद्ध मुक्त प्रगटीकरण. त्यात राहती घरे अली, दुकानदारी आलो, कारखानदारी अली. पेठा गलिया वने उद्याने आली तशी स्मशानेंहि आली. मुळ वस्त्या पाणी आणि सुरक्षित राहणी एवढया तुटपुंज्या गरजेतून वसल्या. नियोजित शहर बसवणे अथवा वाढवणे हे नंतरचे . नियोजन करू त्या प्रमाणे शहरे वसत नाहीत हे सत्य जिकडे तिकडे उगवलेल्या झोपडपट्या ओरडून ओरडून सांगत असतात. सहज तुलना शेतीशी झाली आणि दोन्हीतील साम्य स्थळे दिसू लागली. शेतीत सुद्धा सर्व पीकच येत नाही तर नको असले तरी तण सुद्धा येतेच येते. अजुन पुढे विचार नेला आणि लक्षात आले कि जीवनाची पाऊलवाट सुद्धा अशीच आहे. सगळेच हवे ते देणारी नाही तर थोडे नको ते पण डोक्यावर घेऊनच मुक्कामाला पोचावे लागते. मृगळाप्रमाणे आले म्हणता म्हणता मुक्काम पुढेच जातो आणि पुन्हा पुन्हा नव्याने सुरवात करावी लागते . वर्षानुवर्षे असेच चालत आले आहि पुढेही असेच चालत राहणार जोपर्यंत जगाचे अस्तित्त्व आहे तोपयंत

No comments:

Post a Comment