Friday, December 12, 2014

ठेविले अनंते तैसेचि रहावे

हेचि थोर भक्ति आवडते देवा l संकल्पावी माया संसाराची ll १ ll 
ठेविले अनंते तैसेचि रहावे l चित्ती असो द्यावे समाधान ll २ ll 
वाहिल्या उद्वेग दुखःची  केवळ l भोगणे ते मूळ संचिताचे ll ३ ll 
तुका म्हणे घालू तयावरी भार l वाहू हा संसार देवापाशी ll ४ ll 

तुकाराम महाराजांची  रचना " म्हण "  बनून  जाण्याचे अजून एक उदाहरण . 

 " ठेविले अनंते तैसेचि  राहावे  ". तमाम आळशी आणि कामचुकार माणसांनी बदनाम केलेले वचन . प्रत्यक्षात दुसरा अर्धा भाग अधिक महत्वाचा आहे हे सहसा ध्यानात घेतले जात नाही . " चित्ती असो द्यावे समाधान ".  कुठून येते हे चित्ताचे समाधान ?  यशाने ? धनाने ? किर्तीने ? क्षणिक समाधान कदाचित येतही असेल पण कायमचे समाधान मिळवण्याचा उपाय तुकाराम महाराज प्रस्तुत अभंगातून सांगत आहेत. 
जे काही कर्म माणसाकडून होते त्याला काम किंवा इच्छा आणि त्या मिळवण्यासाठी काही करावे असा संकल्प असावा लागतो . ह्या इच्छा सर्वसामान्यपणे आपल्या वैयक्तिक आवडी निवडी नुसार स्फुरतात . भक्ति मधे हे स्फुरण अर्पण करण्याचे होते. पत्र पुष्प फल तोय असे जे काही भक्त देतो ते मी आवडीने घेतो असे भगवंत गीतेत सांगतात . मग  छोट्या मोठ्या गोष्टी अर्पण करण्या पेक्षा सर्व कामनांचा संकल्पच अर्पण केला तर ? मग संकल्प संसाराचा न राहता भक्तीचा बनून जतो. काही हवे असते तेंवा  ते तसे न होण्याचे भय असते . भक्तिरूप संकल्प भगवत्प्राप्तीशिवाय काहीच मागत नाही . ह्या पातळीवर चित्ताचे समाधान मिळते. सकाम संकल्प कामपुर्तीच्या समाधानाचा  क्षणिक अनुभव कदाचित देईल सुद्धा पण दुसरी इच्छा आणि दुसरा संकल्प स्फुरत नाही तोपर्यंतच . माणसाचे मूळ  स्वरूप शांती समाधान रुपीच आहे तथापि हव्यासापोटी अशांति उत्पन्न होते. ती यातायात संपली कि अपोआप काही करण्याचा संकल्प जाऊन ठेविले अनंते तैसेचि  राहण्यात चित्ताचे  समाधान मिळते . कारण अशांति आधी चित्तात म्हणजे  अंतकरणात उत्पन्न होते. 
संकल्प त्यागाशिवाय संचिताचे दुखः आणि उद्वेग अपरिहार्य म्हणून स्वीकारावा असे सांगायला महाराज विसरले नाही . त्यांचे चरित्र  बघितले तर संचिताचा खूप मोठा भोग भोगून सुद्धा ते संतपदापर्यंत पोचले हे दिसून येते. 



10 comments:

  1. सुंदर विवेचन आहे , धन्यवाद.

    ReplyDelete
  2. Please give a little bit of explanation of संचित. I don't have much knowledge about that. Maharaj said that we have bear the fruits of our good and bad karma. That is called संचिताचे भोग. This is what I understood from your writ. Please explain a little bit, sir.
    Thank you.

    ReplyDelete
  3. This comment has been removed by the author.

    ReplyDelete
  4. खूप छान अभंगाचा अर्थ सांगितलेला आहे खूप खूप धन्यवाद

    ReplyDelete
  5. खूप छान अभंगाचा अर्थ सांगितलेला आहे खूप खूप धन्यवाद🌹🌹🚩🛐

    ReplyDelete